खेड: आळंदीत मोबाइल हॅक करून २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची फसवणूक
Khed, Pune | Sep 24, 2025 मोबाइल हॅक करून बँक खात्यातून २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये दुसऱ्या खात्यात वळवून वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आरोपीने फिर्यादीचा मोबाइल हॅक केला. बँकेच्या खात्यातील ७० लाख रुपयांची मुद्दल आणि सहा लाख ६३ हजार ९१६ रुपयांचे व्याज फिर्यादीच्या बचत खात्यात वळविले.