जालना शहरातील औद्योगीक वसाहत परिसरातील एका स्टील कंपनीसमोर गावठी हातभट्टीची दारू चोरट्या पद्धतीने विक्री करताना एका तरुणाला चंदनझीरा पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. रविवार दि. 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत सुमारे 150 लिटर गावठी हातभट्टीची दारू व एक स्कुटी असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंदनझीरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार प्रशांत किशन देशमुख यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.