रामटेक: रामटेक तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणाचे आरक्षण घोषित; दिग्गजांना धक्का
Ramtek, Nagpur | Oct 13, 2025 रामटेक तालुक्यातील 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गणाचे आरक्षण सोमवार दि. 13 ऑक्टोबरला दु. 2 वाजता घोषित करण्यात आले. जिल्हा परिषदचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे तर पंचायत समिती गणाचे आरक्षण तहसील कार्यालय रामटेक येथील सभागृहात संपन्न झाले. रामटेक येथे संपन्न आरक्षण सोडत सभेची अध्यक्षता उपविभागीय अधिकारी प्रियेष महाजन यांनी केली. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे,देवलापारच्या अप्पर तहसीलदार पूनम कदम, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश कुलदीवार सहाय्यक म्हणून उपस्थित होते .