तळा: तळा:कासार आळी येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा.
Tala, Raigad | Apr 23, 2024 तळा शहरातील कासार आळी येथे मंगळवार दि.२३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कासार आळी येथील हनुमान मंदिरात काकड आरती,भजन,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,माजी जिल्हा परिषद सदस्य माधवी रोडे यांसह कासार आळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.