अंबड–जालना रोडवर लालवाडी तांडा पाटीजवळ भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू अंबड–जालना रोडवरील लालवाडी तांडा पाटीजवळ गुरुवारी (दि. 18) रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आकाश हरिभाऊ राठोड (वय 25, रा. लालवाडी तांडा, ता. अंबड, जि. जालना) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश राठोड हा आपल्या दुचाकीवरून घराकडे जात असताना ट्रॅक्टरशी झालेल्या धडकेत हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रण