मुर्तीजापूर: राष्ट्रीय महामार्ग ५३ लगत हिंदू स्मशानभूमी येथे रेल्वेतून खाली पडून मृत्यू झालेल्या अनोळखी इसमाचा अंतविधी संपन्न
माना पोलीस स्टेशन परिसरात शनिवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान रेल्वे रुळावरील पोल क्रमांक ६४२/८ ते १० च्या मध्ये चालत्या रेल्वेतून खाली पडल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला होता माना पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पाठविण्यासाठी ठाणेदार गणेश नावकार यांनी आवाहन केले असता मंगळवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्या अनोळखी इसमाची ओळख न पटल्याने अखेर राष्ट्रीय महामार्ग लगत हिंदू स्मशानभूमी येथे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंतविधी पार पडला.