जालना शहरातील जिल्हा कारागृह जालना परिसराच्या पाठीमागील भागात अवैध गौण खनिज म्हणजेच मुरूम उत्खनन खुलेआम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सोमवार दि. 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या अवैध उत्खननाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11.35 ते 11.46 या वेळेत या अवैध उत्खननाबाबत तहसीलदार छाया पवार यांना काही लोकांनी माहिती दिली.