गडचिरोली: सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांच्या प्रयत्नातून चंदनखेडी खर्डी जिल्हा परिषद शाळेला मिळाले ओपन जिम साहित्य
विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे सवर्धन व्हावे या संकल्पनेतून शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर चरडे यांनी ओपन जिम साहित्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयात पाठ पुरावा केला त्यामुळे व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत (खुले व्यायामशाळा) साहित्य क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली मार्फत चंदनखेडी जिल्हा परिषद प्रा शाळेसाठी साठी ओपेन जिम साहित्य मंजूर झाले व ते प्रांगणात लावण्यात आले