मालेगांव तालुक्यातील मौजे डोंगरकिन्ही येथील ऍट्रोसिटी ऍक्ट प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी समाज बांधवांच्यावतीने दि. 03 नोव्हेंबर रोजी मालेगाव तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. सदर मोर्चात राजकीय पदाधिकारी व महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.