सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कन्हारपायली येथील उमेश वट्टी वय 45 वर्ष हा युवक शेतातील झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला दिनांक 4 जानेवारी रोजी रविवारला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे. तपास सुरू आहे.