पुणे शहर: शंकर महाराज अंगात येतात, तुमच्या मुलीचा आजार बरा करतो असे भासवून कोथरुडमध्ये १४ कोटी रुपयांची फसवणूक
पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जाते, परंतु पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून सायबर गुन्हे तसेच भोंदू बाबांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ होत आहे. आता देखील पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून शंकर महाराज अंगात येतात, असं भासवून पुण्यातील एका कुटुंबाची १४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबानं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय