जालना शहरातील आनंदनगर परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान घरगुती वादातून तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सोमवार दि. 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी जखमी तरुणाने कदीम जालना पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फिर्यादी जफ्फार शेख निसार शेख रा. नॅशनलनगर जालना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 18 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या वडिलांसह आनंदनगर येथे गेले होते.