वक्फ ट्रिब्यूनलचा मनाई आदेश असतानाही मंगळबाजार परिसरातील दर्गा हजरत जानुल्लाह शाह यांच्या मालकीच्या जागेवर पुन्हा एकदा बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याने वाद निर्माण झाला आहे. गुरुवार दि. 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार व्यवस्थापन समितीने पोलिस अधीक्षक तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याकडे निवेदन देत तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ही जागा उढड छे. 4491 या क्रमांकावर नोंदवलेली असून महाराष्ट्र वक्फ मंडळ मान्यताप्राप्त व्यवस्थापन समितीच्या ताब्यात आहे.