श्रीगोंदा: राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीत झेंड्याच्या चौथऱ्याच्या कामाबाबत नियोजन करण्यासाठी जमलेल्या समाजबांधवांवर राज्य बाजार समितीचे सभापती व सरपंच पती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब बन्सी नाहटा यांनी शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे.