बुलढाणा: अकोली जहागीर येथे माजी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड यांच्याहस्ते महाप्रसादाचे वितरण
अकोली जहागीर येथे 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता सिद्धेश्वर कावड यात्रा समितीच्या वतीने भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सौ. पुजाताई संजय गायकवाड यांनी उपस्थित राहून महाप्रसादाचे वितरण केले.यावेळी सुरेश शिंदे, रोहिणी बाहेकर, मीनाताई शिंदे, संगीता ढेमरे, राजेश ढेमरे, अरविंद ढेमरे, ज्ञानेश्वर खांडवे, मारुती वाळके, आशिष ढेमरे, अमोल लाहोरे आदी उपस्थित होते.