मालेगाव: मालेगाव तालुका पोलिसांची मोठी कारवाई; बनावट नोटांसह दोन परप्रांतीयांना अटक
मालेगाव तालुक्यातील मुंबई–आग्रा महामार्गावर ए-वन सागर हॉटेल समोर, दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास, मालेगाव तालुका पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान संशयित इसमांवर कारवाई करत ₹10 लाख किंमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईत मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील नाजिर अक्रम अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांकडून ₹500 दराच्या 2000 बनावट नोटा, दोन मोबाईल आणि एक बॅग असा एकूण ₹10.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.