सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकसानीपोटी मंजूर केलेला मदतनिधी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी केवळ दोन दिवसांत 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एकूण 185 कोटी रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.