कळमेश्वर: मोहपा गळबर्डी येथे इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागून 20 लाखाचे नुकसान
मोहपा गळबर्डी येथे वैभव इलेक्ट्रॉनिक येथे आग लागून दुकान जळून वीस लाखाचे नुकसान झाल्याची घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या आगीमध्ये दुकानाचे पूर्ण नुकसान झालेले आहे. नेमकी आग कशाने लागली हे अद्यापही कळलेले नाही.