वर्धा: लेणको विदर्भ पॉवर लिमिटेडच्या जमिनीवर MIDC: वर्ध्यात रोजगाराची नवी संधी
Wardha, Wardha | Sep 14, 2025 महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे वर्धा तालुक्यातील आजी ची लेनको कंपनी बाबत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट तसेच वर्ध्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व आमदार राजेश बकाने यांनी रेटून धरली त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांची मागणी आता पूर्ण केली शासनाने लेनको कंपनीची जमीन ताब्यात घेऊन त्यावर एक छोटी MIDC उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल असे14 सप्टें ला सायं 7 वा प्रसिद्धीस दिले.