शिरुर अनंतपाळ: चामरगा,सेवापूरतांडा येथील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केली पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
चाकूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली पाहणी चाकूर आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. चाकूर तालुक्यातील सेवापूर तांडा शिवारात अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतजमिनीत पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली.