सरकारने स्वतः घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी न करता त्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करीत दिव्यांगांना मिळणाऱ्या पेन्शनसह विविध योजनांमधील तफावत दूर करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी केली. या मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. दिव्यांग जिल्हाप्रमुख नाशिकचे ललित पवार, उपजिल्हाप्रमुख रवींद्र टिळे, चंद्रभान गांगुर्डे, जिल्हाप्रमुख मूकबधिर संघटना सिद्धीकी अनिल भडांगे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.