उत्तर सोलापूर: माजी महापौर मनोहर सपाटे यांनी घेतली शरद पवारांची बारामतीत भेट ; सपाटे पुन्हा महापालिकेच्या मैदानात उतरणार...
मराठा सेवा समाज निवडणुकीत समाजातीलच विरोधकांना चारी मुंड्या चित केल्यानंतर माजी महापौर आणि सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी आपले नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सर्वच विजयी संचालकांसह सपाटे त्यांना भेटायला गेले होते. निवडणुकीदरम्यान झालेल्या त्रासाबद्दल सपाटेनी पवार यांना सांगितले असता झालं ना एकदाच असे म्हणून सपाटे यांचे कौतुक केले. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.