धुळे: आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते विठ्ठल मंदिराचे भूमिपूजन संपन्न; श्रीरंग कॉलनीत 'नमो पार्क' उभारण्याची घोषणा
Dhule, Dhule | Oct 19, 2025 धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील श्रीरंग कॉलनीत श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. स्थानिक नागरिकांनी ओपन स्पेसच्या समस्या मांडल्यावर आमदार अग्रवाल यांनी लवकरच ‘नमो पार्क’ उभारण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला डॉ. सुभाष भामरे, गजेंद्र पिंपळकर, बापू खलाणे आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.