मुळशी: पुणे मेट्रोसाठी येरवड्यातील ४८,६०० चौ.मी. जमीन पीएमआरडीएला हस्तांतरित
Mulshi, Pune | Oct 18, 2025 पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन-३) या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला येरवडा येथील ४८ हजार ६०० चौरस मीटर शासकीय जमीन कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.