चिखली: सोनेरी सकाळ देशासाठी समर्पित,चिखलीत भव्य नमो युवा मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
'चला धावूया देशासाठी, सक्षम भारतासाठी' हा संकल्प करत आजची सोनेरी सकाळ उत्साहात उगवली. चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा बुलढाणा च्या वतीने भव्य 'नमो युवा मॅरेथॉन'मध्ये धावण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले शालेय विद्यार्थी, युवक व युवतींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण चैतन्याने भारलेले होते.