देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी कुरळी येथील तरुणाला पोलिसांनी अटक केली देवकर वस्ती भोसरी येथे ही कारवाई करण्यात आली अजय लक्ष्मण नखाते वय 23 लक्ष्मी मंदिर कुरुळी ता. खेड असे अटक आरोपीचे नाव आहे नखातेच्या ताब्यातून 25 हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल मॅक्झिन आणि एक हजार रुपयांचे जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.