धुळे: धुळ्यात थंडीचा कडाका: सकाळच्या शाळा एक तास उशिरा भरवा, शिंदे गट युवासेनेचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे शहरासह जिल्ह्यात वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे पारा आठ ते दहा अंशांवर घसरला आहे. सकाळच्या थंड वातावरणात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने, सकाळच्या सत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा एक तास उशिरा भरवाव्यात, अशी मागणी शिंदे गट शिवसेना आणि युवासेनेने केली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केले आहे.