श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान अनेक गावांचा संपर्क तुटला
श्रीरामपूर तालुक्यात 27 सप्टेंबरच्या रात्री व 28 सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कपाशी ऊस ही पिके भुई सपाट झाले आहे तर सोयाबीन असलेले क्षेत्र पाण्याखाली गेले आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ओढ्या नाल्यांना पूर आल्यने गावांचा देखील संपर्क तुटल्याचे चित्र दिसून येत आहे.