चाळीसगाव: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात 'सेवा पंधरवाडा' अभियानाचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या 'सेवा पंधरवाडा २०२५' अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी चाळीसगावात मोठ्या उत्साहात करण्यात आला. प्रदेश सहसंयोजक आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी चाळीसगाव शहर मंडळाने शहराच्या विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. या अभियानांतर्गत शहरातील प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी झाडू हाती घेऊन परिसर स्वच्छ केला.