नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पो. स्टे. देवलापार अंतर्गत देवलापार नजीकच्या निमटोला नाल्यात र रविवार दिनांक 18 जानेवारीला पहाटे 6 वाजताच्या दरम्यान 35 टन साखरेच्या पोत्यांनी भरलेला बारा चाकी ट्रक उलटण्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालक, वाहक गंभीर जखमी झाले असून दोघांचेही पाय तुटल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळतात देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले. ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने सदर अपघात घडल्याचे कळते