जालना शहरातील सुभाष चौक परिसरात रिक्षामध्ये प्रवास करत असताना एका महिलेची पर्स कापून 30 हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना घडली आहे. शनिवार दि. 14 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंध नरहरी सोनवणे रा. ब्राम्हणगाव, ता. जि. परभणी या 11 मार्च 2026 रोजी त्यांच्या मैत्रीण संगीता महाजन यांच्यासह जालना येथील जुना मोंढा परिसरातील बंजारा कापड दुकानात गेल्या होत्या.