शिरपूर: शहरातील मच्छीमार्केट परिसरात चाकूचा धाक दाखवून एकाला कारसह लुटले,शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी,४ तासांत 2 संशयीत जेरबंद
Shirpur, Dhule | Nov 8, 2025 शिरपूर येथील वन विभागाच्या कार्यालयात 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे 11 वाजेच्या सुमारास जहांगिर खान रा.मालेगाव हे एम.एच.०४/एफ.झेड. ७७३७ क्रमांकाच्या आर्टिका कारने शिरपूर येथील वन विभागाच्या कार्यालयात आला होता दरम्यान तीन संशयितांनी चाकू धाक दाखवत खिशातील 20 हजार,मोबाईल व आर्टिका कारची चावी हिसकावून घेत फिर्यादीच्या भावाला फोन करून 'गाडी पाहिजे तर 50 हजार रुपये दे'असे सांगून कार घेऊन पळ काढला.दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल होताच शिताफीने दोघांना मुद्देमालासह जेरबंद केले तर एक फरार झाला.