उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील फुट वेअर गोदामात कोयत्याचा धाक दाखवून रक्कम पळविल्या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर १८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, १७ डिसेंबर रोजी रात्री उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या अभिजित फुटवेअर दुकानाच्या बाजूच्या फुटवेअरच्या गोदामात येवून आरोपींने संगनमत करून फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून गोदामाच्या गल्ल्यातील ९ हजार ५०० रोख रक्कम पळविली