मंगेझरी परिसरात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कोणत्या प्रकारचे उपाययोजना व प्रयोग करता येतील, याबाबत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा केली.