वैजापूर तालुक्यातील बागायती क्षेत्रातील शेतकऱ्याना बागायती प्रमाणे अनुदान देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत केली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान शासनाने शेतकऱ्याना अनुदान जाहीर केले मात्र वैजापूर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे अनुदान कोरडवाहू मिळाले असे पत्र लिहिले आहे.