कळमेश्वर: मांडवी शिवारात विहिरीत आढळून आले बेपत्ता इसमाचा मृतदेह
मांडवी शिवारात आज बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विठोबाजी बेलसरे यांचे मृत शरीर विहिरीत आढळून आले. सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे अक्षय पाटील विजू ठोंबरे यांनी तातडीने पुढाकार घेत गावकरी व सहकाऱ्यांच्या साह्याने मृतदेह बाहेर काढला. व हितजोती फाउंडेशन यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय सावनेर येथे पाठविण्यात आला मृतक व्यक्ती हा बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पासून घरातून बेपत्ता झालेला होता पुढील तपास पोलीस करीत आहे