आज दिनांक 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे शेत शिवारात 3 एकर मिरचीच्या शेतामध्ये शेतकऱ्याने मेंढ्या सोडल्या आहे, कारण या परिसरात मागील 10 ते 15 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे , त्यामुळे मिरची पिकावर रोगराईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे व लाभलेला खर्च व औषध फवारणी खत याचा काही परिणाम होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने आज चक्क मिरचीच्या शेतात मेंढ्या सोडल्याचे पाहायला मिळाले आहे.