गोंडपिंपरी: विजेचे धक्क्याने महिलेचा मृत्यू, वडोली येथील घटना
विजेच्या धक्क्याने वढोली येथील एका विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ६ वाजता घडली. किरण दशरथ कोहपरे (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे. किरण कोहपरे ही घरगुती कामे करीत होती. दरम्यान, घराच्या टिन पत्र्याला हात लावताच अचानक विजेचा धक्का बसला. सासूने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. लगेच गोंडपिंपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.