जिल्ह्यातील शेलुबाजार येथील दानशूर व सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कर्नावट परिवार व अकोला येथील कांकरिया परिवार यांचा परिवारातील रोहित कर्नावट व काजल कांकरिया यांचा आदर्श नोंदणी विवाह वाशीम येथील सह दुय्यम निबंधक तथा विवाह अधिकारी कार्यालय येथे सोमवार 17 नोव्हेंबर रोजी पार पडला. दुय्यम निबंधक अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत वर वधूंनी प्रतिज्ञा घेत रीतसर नोंदणी विवाह पार पाडला.