उदगीर: गावाला लागलेला डाग पुसून काढू,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांचे विधान
Udgir, Latur | Oct 22, 2025 येत्या काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत, उदगीर तालुक्यातील तोगरी जिल्हा परिषद गट हे सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले असल्याने अनेक इच्छुकाचे लक्ष लागले आहे,सामाजिक कार्यकर्ते लक्षीमिकांत पाटील कौळखेडकर यांनी आतापासूनच या भागातील गावात भेटी गाठी घेण्यासाठी दौरे सुरू केले आहेत,२२ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी तोगरी गटातील कुमदाळ या गावातील नागरिकांच्या भेटी घेतल्या व मतदारांशी संवाद साधत गावाला लागलेला डाग आपण पुसून काढू असे विधान त्यांनी केले