आज दिनांक 2 जानेवारी 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील शेलगाव फाट्यावर भोकरदन राजूर या मुख्य मार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघाताविषयी सविस्तर माहिती अशी की भोकरदन वरून राजुरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेमध्ये दोन्हीही ट्रकची मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही,मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती