गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेर यशस्वी ठरला असून जालना शहरातील एका अनाधिकृत फटाक्याच्या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. गुरुवार दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एका परवान्यावर दोन ठिकाणी फटाक्यांची विक्री केली जात असल्याच्या प्रकरणात महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने प्रकाश जैन यांचे अनाधिकृत दुकान सिल केले आहे. जालना शहरातील सराफा बाजार परिसरात सखाराम जैन यांच्या मालकीच्या एकाच ठिकाणी परवाना असताना दोन ठिकाणी दुकान सुरू होते.