अलिबाग: जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा, रायगड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम
Alibag, Raigad | Dec 1, 2025 प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई आणि जिल्हाधिकारी व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्या नियोजनानुसार आज १ डिसेंबर जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्फत १ ते १५ डिसेंबर दरम्यान विविध जागरूकता उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचा एक भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व पथकांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.