महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित होणारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.२३) होणार आहे. यंदा परीक्षार्थींवर लक्ष ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. डमी उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी प्रथमच फोटो व्ह्यू प्रणाली तयार करण्यात आली असून, हातात मोबाइल असल्यास हॅण्ड-होल्ड डिटेक्टरद्वारेही तपासणी केली