चंद्रपूर: पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज 'शून्य'; तिकीटयुद्ध तापले!, चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक
चंद्रपूर : जिल्ह्यातील दहा नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि. १०) सुरू झाली असली तरी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष इच्छुकांकडून शांत प्रतिसाद मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. प्रमुख पक्षांमध्ये 'तिकीट युद्धा'ची स्थिती निर्माण झाल्याने उमेदवारीवर संभ्रम कायम आहे. दरम्यान, मतदारांमध्ये उत्कंठा वाढली आहे.