अपेक्स मजदूर संघ आणि राज्य कामगार विमा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अपेक्स बिल्डसीस लिमिटेड येथील कामगारांसाठी भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर उत्साहात पार पडले. अपेक्स मजदूर संघाचे उपाध्यक्ष रोहीत सुधीर पारवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.यावेळी डॉ. कांबळे व त्यांची वैद्यकीय टीम, तसेच संघाचे पदाधिकारी प्रभाकर बुचे, बबन देशमुख आणि अन्य सदस्य उपस्थित होते.