चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी ६२ एसएसटी पथके तैनात करण्यात आले असून शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकांची भेट घेतली आहे. यावेळी पोलीस विभागाला जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह अधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. यात राजुरा विधानसभा मतदार संघात १५, चंद्रपूर ४ , बल्लारपूर ६ , वरोरा १२ , वणी १३, आर्णी येथे १२ पथकांचा समावेश आहे.