दिग्रस: नगरपरिषद निवडणूकीत १४ उमेदवारांची माघार; १०८ उमेदवार निवडणूक रिंगणात
दिग्रस नगर परिषद निवडणुकीत उमेदवार माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १४ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज परत घेतले. त्यामुळे आता १०८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. यापूर्वी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी मिळून १८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ६१ अर्ज छाननीत बाद झाले. उर्वरित १२२ पात्र अर्जांपैकी आज १४ जणांनी माघार घेतली.