आज 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा साठवा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सलमान खान वर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे मात्र लक्ष वेधले ते म्हणजे एम एस धोनीने शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या हजेरीने. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एम एस धोनी आपल्या कुटुंबासोबत पनवेल मधील फार्म हाऊस वर आला आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी झाला अशी माहिती मिळत असून व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.