संगमनेर: नाशिक–पुणे महामार्गावर भीषण अपघात : कार-आयशर टेम्पोची समोरासमोर धडक, महिलेचा मृत्यू
नाशिक–पुणे महामार्गावर भीषण अपघात : कार-आयशर टेम्पोची समोरासमोर धडक, महिलेचा मृत्यू संगमनेर तालुका : नाशिक–पुणे महामार्गावरील चंदनापुरी गावाजवळ आज दुपारी १२ वाजता कार आणि आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत लता काळे (रा. कर्जत तालुका, अहिल्यानगर जिल्हा) यांचा मृत्यू झाला असून कारमधील इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर संगमनेरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.